उन्नाव बलात्कार प्रकरण निर्भया बलात्कार प्रकरणापेक्षा भीषण आहे?
उन्नाव प्रकरण हे कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारं आहे. बलात्काराविरोधात आवाज उठवला म्हणून वडिलांचा खून, काकाला तुरुंगवास, धमक्या आणि शेवटी अपघातात नातेवाईकांचे मृत्यू आणि पीडितेची मृत्युशी झुंज... पोलीस यंत्रणा किती बेदरकारपणे वाकवून एखाद्याचे आयुष्य उदध्वस्त करता येते, हा राजकारणाचा विकृत चेहरा दाखवणारी ही एका अभागी मुलीची कहाणी आहे.......